देहुरोड कॅंटोन्मेंटमध्ये नागरिकांना निर्बंध

  • देहुरोडकरांमध्ये नाराजीचा सूर

देहुरोड – देहुरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयात नागरिकांना कामकाजांसाठी वेळेचे निर्बंध घालण्यात आले आहे. तसेच नवनवीन होणारे नियमांनी देहूरोडकरांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

देहुरोड कॅंटोन्मेंट बोर्ड प्रशासनाने गेल्या दीड महिन्यांपासून बोर्ड कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना कामकाजासाठी वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. सकाळी नऊ ते साडेचार या नागरिकांच्या कामकाजाच्या वेळेत फेरबदल करीत सकाळी नऊ ते एक असे चार तास या वेळेत नागरिकांनी आपले कामकाज करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. फक्‍त मालमत्ता कर अथवा अन्य कर भरण्यासाठी दुपारी साडेचारपर्यंत प्रवेश देण्यात येत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नागरिकांच्या समस्या, तक्रारी, अन्य माहिती संदर्भातील कामांना लेखी स्वरूपाचे अर्ज करावयाचे आहे. ते अर्ज कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ उपलब्ध करण्यात आलेल्या एक खिडकी कक्षात देण्याचे निर्बंध घालण्यात आले आहे. कामाशिवाय कोणीही नागरीक जात नसतानाही घालण्यात आलेल्या वेळेच्या बंधनाने त्रास सहन करावा लागत आहे. एखाद्या रखडलेल्या कामाचा पाठपुरवठा करण्यासाठी नागरिकांना बोर्ड कार्यालयात वारंवार जावे लागत होते; मात्र प्रवेश बंदीच्या निर्बंधाने या कामकाजावरही बंधन निर्माण झाले आहे.

निमशासकीय, शासकीय अथवा पहिल्या पाळीत कामाला जाणाऱ्या नागरिकांना बोर्डाच्या कामासाठी संपूर्ण दिवसाची रजा घ्यावी लागत आहे. त्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे. प्रवेशद्वारावर असणारे सुरक्षा रक्षक नागरिकांना प्रवेशद्वारातून आत येताना कामकाजाची माहिती, कोणास भेटावयाचे आहे. येण्याची वेळ, स्वाक्षरी आदी माहितीची नोंद केल्याशिवाय प्रवेश करण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. या नोंदवहीत प्रवेश घेतल्याची नोंद करण्यात येते मात्र कार्यालयातील कामकाज उरकून परत जाणाऱ्या नागरिकांची नोंद करण्यात येत नसल्याचेही प्रवेशद्वाराच्या नोंदवहीत दिसून आले आहे.

कामकाजानिमित्त बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटण्यासाठी त्यांच्या कक्षात जाणाऱ्या व्यक्‍तींना प्रथम आपले मोबाईल प्रवेशद्बारावरील सुरक्षारक्षक अथवा कार्यालयातील शिपाईजवळ द्यावे लागत आहे. नंतरच विना मोबाईल प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे कार्यालयातील पारदर्शकतेवर नागरिकांनी संशय व्यक्‍त केला आहे. त्यामुळे नागरिकांवरील कार्यालयात येण्यास निर्बंध घालण्याचा उद्देश स्पष्ट दिसून येत आहे. तसेच एखाद्या कामानिमित्त कार्यालयातील विविध विभागातील एखाद्या माहिती संदर्भात संबंधित व्यक्तीस भेटावयाचे असल्यास त्यासही निर्बंध बसला आहे. बोर्डाच्या ई-समाधान सूचना, तक्रारी देण्यासाठी असलेला मोबाईल क्रमांक (8888648700) दीड वर्षांपासून बंद असताना नागरिकांना विविध समस्या तक्रार अगर सूचना करण्यास अडथळा निर्माण होत आहेत.

बोर्डाचे नवनवीन निर्माण होणाऱ्या निर्बंधाने देहुरोडकरांच्या विश्‍वासहार्तावर घाला घालत परदेशातील नागरीक असल्याची, तर देशात लोकशाही असताना ब्रिटिशकालीन हुकूमशाहीत असल्याचे भास होत असल्याने नाराजीचा सूर देहुरोडकर यांनी व्यक्‍त केला आहे. याबाबत बोर्ड कार्यालयातील (020-27671222) दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळून आला नाही, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत सानप यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)