देहुरोड कँटोन्मेट बोर्डाच्या हद्दीत फ्लेक्‍सबाजीला आळा बसणार

कडक नियमावली : जाहिरात फलक धोरण ठरविण्याबाबत बैठकीत विविध सूचना

देहूरोड – देहूरोड कँटोन्मेट बोर्डाच्या वतीने पोलीस प्रशासन, बोर्डाचे पदाधिकारी, सदस्य तसेच विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची कॅन्टोमेन्टचे नव्याने जाहिरात फलक धोरण निश्‍चित करणेबाबत मते व सूचना जाणून घेण्याबाबत संयुक्‍त बैठक मंगळवारी (दि. 24) कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सभागृहात झाली. यापुढे वाढदिवसाचे फलक लावण्यापूर्वी सात दिवस अगोदर अर्ज करावेत. पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र आणल्यानंतरच फलक लावण्याची परवानगी देण्यात येणार आहे, अशी माहिती बोर्डाचे सीईओ अभिजित सानप यांनी दिली.

या बैठकीला “सीईओ’ अभिजित सानप, पोलीस उपअधीक्षक जी. एस. माडगूळकर, बोर्डाचे उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल, बोर्ड सदस्य रघुवीर शेलार, हाजीमलंग मारीमुत्तू, गोपाळ तंतरपाळे, ललित बालघरे, अरुणा पिंजण, पोलीस निरीक्षक अरुण मोरे, माजी उपाध्यक्ष अली शेख, भाजपचे शहराध्यक्ष कैलास पानसरे, कामगार नेते लहू शेलार, शिवसेनेचे शहरप्रमुख महेश धुमाळ, मनसेचे अध्यक्ष विनोद भंडारी, बसपाचे अध्यक्ष अशोक गायकवाड, भीमशक्तीचे अध्यक्ष महेश गायकवाड, भाजपचे सूर्यकांत सुर्वे, वैशाली अवघडे, दीपक चौघुले, शशिकांत सप्पागुरु, कार्यालय अधीक्षक श्रीरंग सावंत, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सार्वजनिक व खासगी मालमत्ता मोकळ्या जागांवर, रस्त्यांलगत वाहतुकीला अडथळा ठरतील अशा पद्धतीने लावण्यात येणारे फलक तसेच उच्च न्यायालयाचे जाहिरात फलकांबाबत निर्देश न पाळता लावण्यात येणारे विविध प्रकारच्या फलकांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत चालले आहे. विविध समारंभ, निवड नियुक्ती, महापुरुष जयंती, पुण्यतिथी, वैयक्तीक शुभेच्छा, वाढदिवस, धार्मिक कार्यक्रम आदींचे फलक मोठ्या प्रमाणात परवानगी न घेता लावण्यात येत आहेत. तसेच अनेकदा फलकामुळे वादाचे प्रसंग निर्माण होत असल्याची चर्चा बैठकीत झाली. चर्चेत भाग घेत खंडेलवाल, मोरे, पानसरे, शेलार, मारीमुत्तू , तंतरपाळे, सुर्वे, भंडारी, गायकवाड, मोरे, पिंजण, धुमाळ, चौघुले आदींनी विविध सूचना केल्या.

सानप म्हणाले की, देहूरोडमधील विविध राजकीय पक्ष व विविध संघटनांनी महापुरुषांच्या जयंतीला प्रत्येकाचे वेगळे फलक न लावण्याच्या निर्णय घेतल्यास यापुढे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने संबंधित महापुरुषांच्या जयंतीला काही ठिकाणी फलक लावण्याचा निर्णय बोर्डामार्फत घेण्यात येईल. वाढदिवसाचे फलक लावण्यापूर्वी सात दिवस अगोदर अर्ज करावेत. पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र आणल्यानंतरच फलक लावण्याची परवानगी देण्यात येणार आहे. खासगी इमारतींवरील होर्डिंगवर कारवाई करण्यात येणार आहे. रस्त्यांवरील हातगाड्यांमुळे व अतिक्रमणांवर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)