देहुरोड आयुध निर्माणी कारखान्यात विविध कार्यक्रम

देहुरोड – येथील आयुध निर्माणी कारखान्याच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. देहुरोड आयुध निर्माणीचे सरव्यवस्थापक संतोषकुमार सिन्हा यांच्या संकल्पनेतून यंदा प्रथमच क्रिडांगणात सांस्कृतिक व इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संतोषकुमार सिन्हा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून आयुध निर्माणीतील पंचवीस वर्षे सेवकाल पूर्ण केलेल्या तसेच उत्पादन, गुणवत्ता, दर्जा, सुरक्षा, कर्मचारी, स्वच्छता व प्रशासन विभागात उल्लेखनीय व अनुकरणीय काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरवचिन्ह, घड्याळ व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. केंद्रीय विद्यालय व अंकुर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. प्रशासनाने आठवडाभर या कार्यक्रमांची जय्यत तयारी केल्याने कार्यक्रमाला सर्व स्तरातून मोठा प्रतिसाद मिळाला.

-Ads-

यावेळी आयुध निर्माणीतील संयुक्त महाप्रबंधक ललित खोब्रागडे यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी त्यांचे कुटुंबीय तसेच केंद्रीय विद्यालय क्रमांक दोनमधील विद्यार्थी, अंकुर विद्यामंदिर येथील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पायरो क्रीडा मैदानात झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात देशातील विविध राज्यांतील परंपरा, लोकनृत्य, लोकसंगीत सांस्कृतिक कार्यक्रम तसेच देशभक्‍तीवर आधारित गीते सादर करण्यात आली. विद्यार्थ्यानी संचलन व कवायती सादर केल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)