देहुरोडला संविधान दिन उत्साहात साजरा

देहुरोड – देहुरोड शहर परिसरात ठिकठिकाणी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनानी संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संविधान उद्देशिकाचे वाचन करण्यात करून संविधान रॅलीचे आयोजन केले होते.

देहुरोड कॅंटोन्मेंट बोर्ड कार्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या संविधान उद्देशिकेच्या प्रतिमेला कॉंग्रेसचे शहराध्यक्ष, नगरसेवक हाजीमलंग मारीमूत्तू, गोपाळराव तंतरपाळे, भाजपाचे विशाल खंडेलवाल, उद्धव शेलार यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी बोर्ड सदस्या ऍड. अरूणा पिंजण, माजी उपाध्यक्ष अशोक शेलार, किसन झेंडे आदी उपस्थित होते. कार्यालय अधीक्षक पंढरीनाथ शेलार यांनी प्रास्ताविकेचे वाचन केले. बोर्ड सदस्य तंतरपाळे, खंडेलवाल यांनी मनोगत व्यक्‍त केले. त्यांनी संविधान निर्मितीपासूनची सविस्तर माहिती देत संविधानाचे महत्त्व व्यक्‍त केले. सुनील गुरव यांनी सूत्रसंचालन केले.

देहुरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे रुग्णालय येथे संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला बोर्डाचे उपाध्यक्षा सारिका नाईकनवरे, सदस्य विशाल खंडेलवाल, हाजीमलंग मारीमुत्तू, डॉ. टी. एम. वाकचौरे, पोलीस उपनिरीक्षक अबुकर लांडगे, बसपाचे देहुरोड शहराध्यक्ष अशोकराव सोनवणे, माजी पोलीस उपनिरीक्षक महादेव सुर्वे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. संविधानाचे पूजन करण्यात आल्यानंतर संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ऍड. कृष्णा दाभोळे, भाजपचे शहराध्यक्ष ऍड. कैलास पानसरे, बुद्ध विहार ट्रस्टचे सुनील कडलक, संजय ओव्हाळ, बोर्डाचे माजी उपाध्यक्ष अली शेख, बापुसाहेब गायकवाड, बहुजन विकास आघाडीचे संजय धुतडमल, देहूरोड विकास समितीचे सोलोमनराज भंडारे, राजु मारीमुत्तु, परशुराम तेलगु, के. एच. सूर्यवंशी, बसपाचे जिल्हा प्रभारी अशोक गायकवाड, प्रवीण साखरे, मेनुद्दीन शेख, हमीद कुरेशी, मायकेल पिल्ले, ईलाही शेख, भास्कर भवार, विजु ढावरे, बाबा गायकवाड, डी. एम. धाडोंरे, उत्तम सावंत, दिपक भालेराव, श्रीहर्ष वाघमारे, सतीश वाघमारे, शिरीष रोकडे, रघु धुतडमल, यशवंत गायकवाड आदी उपस्थित होते.

मुंबई येथे 26/11 च्या घडलेल्या घटनेत शहीद झालेल्या पोलीस, जवान आणि मृत्युमुखी झालेल्या नागरीकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तत्पूवी शिक्षक डी. एम. तापकीर यांना सन्मानीत करण्यात आले. उमेश ओव्हाळ यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांनी केले.

भाजप युवा मोर्चाच्या वतीने आयोजित संविधान रॅलीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची बाजारपेठतून मिरवणूक काढण्यात आली. ऐतिहासिक धम्मभूमि बुद्धविहार येथे आमदार बाळा भेगडे यांनी रॅलीचे स्वागत केल्यानंतर संविधान उद्देशिकाचे वाचन केले. देहुरोड पोलीस ठाणे, देहुरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या चिंचोली, देहूरोड, किन्हई, मामुर्डी आदी शाळांत संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे वाचन करून संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)