देहुरोडला शिवसेनेच्या वतीने महाआरती

देहुरोड – अयोध्येतील रामजन्मभूमीवर रामाचे मंदिर उभारण्यासाठी देहू-देहूरोड परिसरातील शिवसैनिकांनी व राम भक्‍तांनी मंदिरामध्ये जय श्रीरामचा जयघोष करीत महाआरती केली. महाआरतीने मंदिर परिसर भक्‍तीमय वातावरणात न्हावून निघाला होता.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रामजन्मभूमीत साधू महंतांच्या व हजारो शिवसैनिक व राम भक्‍तांच्या उपस्थितीत शरयू नदी काठी महाआरती केली. त्यांना पाठिंबा दर्शवित महाराष्ट्रासह देशभरात ठिकठिकाणी महाआरती करण्यात येत होती. तीर्थक्षेत्र देहू शिवसेनेच्या वतीने संत तुकाराम महाराज मुख्य मंदिरात प्रभू श्रीराम मंदिरात महाआरती करण्यात आली. या वेळी देहू शिवसेना प्रमुख सुनील हगवणे, रमेश हगवणे, सोमनाथ परंडवाल, संस्थानचे विश्‍वस्त सुनील दामोदर मोरे, महाराजांचे वंशज धनंजय मोरे यासह महिला आघाडी, शिवसैनिक, वारकरी, रामभक्‍त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-Ads-

देहूरोड येथील मेन बाजारपेठेतील वैश्‍य समाज मंदिरात येथील शिवसैनिकांनी महाआरती केली. शिवसेनेचे माजी शहरप्रमुख रमेश जाधव, राजेश शेलार, बबन पाटोळे, शशिकांत सप्पागुरू, विजय थोरी, सुनंदा आवळे, संदीप बालघरे, विजय वंजारे यासह शिवसैनिक व रामभक्‍त उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)