देहुरोडला रिव्हॉल्व्हर व पिस्तूलासह तरुणास अटक

जिवंत काडतूसही जप्त, आठवड्यातील दुसरी घटना

देहुरोड – ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने देहुरोड शितळानगर येथून बुधवारी दुपारी एक गावठी रिव्हॉल्व्हर, एक पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसांसह एका तरुणास अटक केली.

इसाक मुकेश मॅकेलिरी (वय 23, रा. शितळानगर, देहुरोड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. खबऱ्याकडून माहिती मिळताच शितळानगर परिसरात सापळा रचून इसाकला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने घरामागे लपवलेले एक गावठी रिव्हॉल्व्हर, एक पिस्तूल व पाच जिवंत काडतूस काढून पोलिसांच्या ताब्यात दिले, अशी माहिती पोलिसांनी दिली. अधिक तपास देहुरोड पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)