देहुतील प्रलंबित विषयांना अखेर मुहुर्त

देहुरोड – देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बैठकीत कित्येक विकास कामांना मान्यता मिळाली. बैठकी दरम्यान कित्येक प्रस्तावांचा विरोध ही झाला, परंतु या दरम्यान शाळांच्या बांधकामांपासून ते घरोघरी कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्या, स्मशानभूमी बांधकाम असे कित्येक महत्त्वाचे विषय मार्गी लागले.

देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या दोन शाळांच्या नवीन बांधकामास सुमारे 2 कोटी 85 लाख रुपये खर्च अपेक्षित असून अंतिम मान्यतेसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बोर्डाच्या हद्दीतील नागरी व लष्करी भागात घरोघरी कचरा गोळा करण्यासाठी दहा चारचाकी घंटा गाड्या घेणे बाबत निविदा मागविण्यास मान्यता देण्यात आली . साफसफाई करणाऱ्या ठेकेदारास एक वर्षे मुदतवाढ देण्याचा प्रस्तावास सदस्यांनी विरोध दर्शविला. यामुळे याच ठेकेदारास तीन महिन्यांकरिता मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली. तसेच किन्हई येथे 66 लाख रुपयांच्या खर्चाने स्मशानभूमी बांधण्यास मान्यता देण्यात आली .

-Ads-

कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर ओ. पी. वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सानप, उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल, लष्करी सदस्य लेफ्टनंट कर्नल राजीव लोध, कर्नल विवेक कोचर, कर्नल राहुल गर्ग, सदस्य रघुवीर शेलार, गोपाळराव तंतरपाळे, ललित बालघरे, ऍड अरुणा पिंजण यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीलाच सदस्य हाजीमलंग मारीमुत्तू यांनी अर्थ समिती बैठकीत निविदा उघडण्याची सूचना मांडली. बोर्डाच्या नागरी भागात साफसफाई करणाऱ्या कामगारांना पूर्ण वेतन दिले जात नसल्याच्या कारणावरून सदस्या ऍड पिंजण यांनी ठेका देण्याच्या प्रस्तावास विरोध केला. यावर अध्यक्ष वैष्णव यांनी संबंधित ठेकेदाराच्या व्यवस्थापकास बैठकीत बोलवून सफाई कर्मचाऱ्यांचे हजेरी पत्रक, पूर्ण पगार देणेबाबत तसेच पगार त्यांच्या बॅक खात्यावर जमा करणेबाबत स्पष्ट सूचना करुन तीन महिने मुदतवाढ देण्यास मान्यता दिली. डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दंत विभागासाठी साहित्य खरेदीची एक लाख आठ हजार रुपयांची निविदा मान्य करण्यात आली. हिंदी माध्यम शाळेतील संगणक प्रशिक्षण करारास मान्यता देण्यात आली. चिंचोली येथील बालघरे आळी ते सावंत आळी भागातील रस्त्याबाबत निर्माण झालेला प्रश्न सोडविण्यासाठी एक समिती नेमून तोडगा काढण्यास मान्यता देण्यात आली. देहुरोड येथील शाळा इमारत एका धार्मिक कार्यक्रमास भाड्याने देण्यास मान्यता देण्यात आली.

कॅन्टोनमेंट बोर्डाच्या हद्दीतील नागरी व लष्करी भागात घरोघरी कचरा गोळा करण्यासाठी सध्या तीन चाकी ( रिक्षा ) घंटागाडीमार्फत कचरा गोळा करण्यात येत असून या गाड्यांबाबत विविध अडचणी व तक्रारीमुळे आगामी काळात घरोघरी ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी दहा चारचाकी घंटा गाड्या चालकासह भाड्याने घेणे बाबत निविदा मागविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)