देहऱ्यात श्रमदानातून जलसंधारणाची 20 लाखांची कामे

पाणी फाउंडेशन-ग्रामस्थांचे नियोजनातून काम पूर्ण

नगर – “पाण्याचे गाव’ अशी ओळख असलेल्या तालुक्‍यातील देहरे ग्रामस्थांनी व पाणी फाउंडेशनने तब्बल 20 लाख रुपयांची जलसंधारणाची कामे पूर्ण केली आहेत.

बाराही महिने बागायती क्षेत्र असलेल्या व कधीच पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरची मागणी न करणारे नगर-मनमाड मार्गावरील देहरे हे प्रमुख गाव आहे. गावातील मोठा भाग लष्करी क्षेत्रात गेलेला आहे. पाणी फाउंडेशन व ग्रामस्थांनी जलसंधारणाची अनेक कामे केली. शोषखड्डे 190, वृक्षलागवडीसाठी नर्सरीच्या माध्यमातून 13 हजार रोपांची निर्मिती केली आहे. खासगी प्रयोगशाळेद्वारे येथील माती परीक्षण करण्यात आले आहे. या माध्यमातून सीसीटीची चार कामे, 5 मातीनाला बंधारे दुरुस्ती, एका मोठ्या पाझर तलावाचे खोलीकरण करून पाणी गळती रोखण्यासाठीची कामे पूर्ण करण्यात आली.
या कामांमुळे गावातील 3 हजार एकर क्षेत्राला फायदा होणार आहे. “वॉटर कप’ स्पर्धेत सहभागी होताना ग्रामस्थांनी “पाणी आडवा, पाणी जिरवा’ या योजनेलाच प्राधान्य दिले. गावकऱ्यांना भारतीय जैन संघटनेने 2 जेसीबी व 1 पोकोलेन मशीन उपलब्ध करून दिले.

वॉटर फाउंडेशनचे नगर तालुका समन्वयक विक्रम पाठक, आदेश चंगेडिया, भूषण भंडारी आदींसह ग्रामस्थांना मोठा सहभाग होता. वॉटर कप स्पर्धेच्या प्रशिक्षणात सहभागी झालेले विक्रम काळे, अनिल लांडगे, संतोष भगत, राहुल करंडे, ब्रिजीश शेख, सविता सोनवणे, जयश्री धोत्रे यांनी कामाला गती देण्यासाठी व लोकसहभाग वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले.

अनिल कारंडे, एकनाथ काळे, यशवंत काळे, ज्ञानेश्‍वर लांडगेंसह गावातील बचत गटाच्या महिलांनी मोठ्या प्रमाणात श्रमदान करून या कामात वेगळा ठसा उमटविलेला आहे. सर्वांच्या सहकार्यामुळे व पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गाव व परिसरात मोठ्या प्रमाणात कामे झाल्याची भावना व पंचायत समिती सदस्य व्ही. डी. काळे यांनी व्यक्‍त केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)