“देसी गर्ल’ देणार डेटींगचे धडे

नेहमी काही ना काही कारणांमुळे बॉलिवूडची “देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा सतत चर्चेत असते. बॉलीवूडपासून ते हॉलीवूड आणि अभिनयापासून निर्मीतीपर्यत अशा विविध क्षेत्रात प्रियांकाने यशस्वीपणे कामगिरी करत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. ती आता नव्या क्षेत्रात आपले नशीब आजमावणार आहे. चक्क डेटींगचे धडे देताना ती आता दिसणार आहे.

प्रियांका एक नवे डेटिंग ऍप सुरू करत असून “बंबल’ असे या ऍपचे नाव आहे. प्रियांकानेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या डेटिंग ऍपची माहिती शेअर केली आहे. प्रियांका आता अभिनयाबरोबरच स्मार्ट इनवेस्टर देखील झाली आहे. तिने डेटिंग ऍप “बंबल’मध्ये गुंतवणूक करण्यासोबतच सॅन फ्रांसिस्कोच्या स्टार्टअप होल्बर्टन शाळेत देखील पैसे लावले आहेत. प्रियांकाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करुन लिहीले आहे की, माझ्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे. मी “बंबल’ आणि होल्बर्टन शाळेसोबत काम करण्यास उत्सुक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)