देश हुकूमशाहीकडे वळत आहे- अजित पवार

मुंबई: देश हुकूमशाहीकडे वळत आहे. मागच्या दाराने हुकूमशाही आणली जात आहे. व्यक्तीस्वातंत्र्य हिरावले जात आहे. त्यामुळे देशात असहिष्णुता वाढत चालली असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भिवंडीच्या सभेत केली.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना यंत्रमाग कंपन्यांसाठी आम्ही वीज दिलासा दिला. त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला होता. पण या सरकारने काहीच केले नाही. स्थानिक व्यपार ठप्प झाला आहे. बेस्ट संपाचा आज ७ वा दिवस, महिला रस्त्यावर उतरल्या आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या संपाला भाजप-शिवसेना जबाबदार आहे. एकमेकांना खड्ड्यात गाडा नाही तर मातीत लोळवा पण आमच्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांचे, सामान्य मुंबईकरांचे प्रश्न सोडवा, अशी मागणी पवार यांनी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)