देश कि ड्युटी सबसे पहले…(प्रभात शॉर्ट फिल्म कॉर्नर)

एका बड्या कार कंपनीच्या 20 वर्षेपूर्तीचा आणि ७२ व्या स्वातंत्र दिनाचा योग साधून त्या कंपनीने सुंदर जाहिरात केली आहे. ही जाहिरात जर तुम्ही पहिली तर तुमच्या मनात देखील ती निरपेक्ष देशप्रेमाची भावना नक्कीच जागवते.

तर ही जाहिरात सुरु होते अशी, आर्मीमधील पदवीवितरण समारंभानंतर तेथे नवीन अधिकारी मेजवानीचा आनंद घेत असतात. त्यावेळी एक उच्च पदाधिकारी तेथे येतो आणि त्यांना विचारतो, तम्ही तयार आहेत का तुमच्या जीवनातील नवीन खेळीसाठी? त्याला उत्तर देताना ते नवीन अधिकारी त्यांना होकार दर्शवितात. उत्सुकतेपोटी ते उच्च अधिकाऱ्याला विचारतात सर, तुमची पहिली पोस्टींग कुठे होती? त्यावर ते सांगतात “कारगील’. सर्व खूप उत्साहित होतात त्यावेळी ते उच्च अधिकारी त्यांची कथा सांगण्यास सुरुवात करतात.

मला ताबडतोब तेथे पोहचायचे आदेश होते आणि त्यातच रेल्वे इंजिन पाणी प्याले. त्यानंतर काय ? असा लगेच प्रश्न आला आणि ते पुढे म्हणाले ” नंतर काय, रिमेम्बर सोल्जर नेव्हर क्विट्‌स !” सैनिक कधी थांबत नसतात, पुढे पायीच जात राहिले, कारण एक रस्ता संपला म्हणजे दुसरा मिळतच असतो.

माझ्या विरुद्ध दिशेने कारने निघालेल्या गृहस्थाने मला लिफ्टसाठी विचारणा केली आणि मला माझ्या ठिकाणी सोडण्यासाठी तत्परता दाखवली. गप्पागोष्टी होत असताना काही वयक्तिक गोष्टी निघाल्या. तो सांगत होता, प्रेमिकेसोबत लग्न करण्यासाठी प्रेमिकेच्या वडिलांची एक अट आहे ती म्हणजे मला सरकारी नोकरी मिळाली तरच लग्न. नोकरी संदर्भातच मुलाखतीसाठी जात होतो.

तो खूपच निर्मळ मनाचा माणूस होता. त्याने आपल्या मुलाखतीवर आणि परिणामी आपल्या प्रेमिकेवर आणि प्रेमावर पाणी घालून मला निरपेक्ष मानाने, कोणतीही अपेक्षा न ठेवता मदत करत होता. मला वेळेत कारगीलला पोहचवल्यानंतर तो म्हणाला, बघा तुम्हाला वेळेत पोहचवले. मी म्हणालो , पण तुम्ही त्यासाठी तुमची मुलाखत सोडली. त्यावर तो सद्गृहस्थ म्हणाला,”हमारा तो क्‍लियर है जी जो देश कि ड्युटी पर जा राहा हो, उसकी ड्युटी सबसे पहले करो.”

सर, तुम्ही पुन्हा कधी त्यांना भेटलात का? त्यावर ते उच्च अधिकारी रावत साहेब म्हणून आवाज देतात आणि पुन्हा तो सदगृहस्थ तेथे दिसतो. त्याची सर्वांना ओळख करून देतात आणि त्यांना काही बोलण्याची विनंती करतात तेव्हादेखील तो सदगृहस्थ हेच बोलतो, ‘हमारा तो क्‍लियर है जी जो देश कि ड्युटी पर जा राहा हो, उसकी ड्युटी सबसे पहले करो.”

मराठमोळ्या अतुल कुलकर्णी त्याची उत्तम संवादशैली आणि या व्हिडिओला लाभलेले जबरदस्त पार्श्वसंगीत आणि यातील निरपेक्ष देशभक्ती या बाबीमुळे हा व्हिडिओ आपल्यातील देशप्रेम नक्कीच जागे करतो. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊन आजही आपल्या देशात देशाची सेवा करणऱ्या व्यक्तींना लोक मदत करताहेत याची हा व्हिडिओ आपसूकच जाणीव करून देतो.
– राजकुमार ढगे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)