देश अभिमान हाच धर्म..!!! (प्रभात..open house)

माझा देश, माझा गर्व
देश सेवा हेच कर्म
विविध, भाषा, वेश तरी
देश अभिमान हाच धर्म

देश माझा भारत
आता प्रगतीपथावर चालतोय
अनमोल संस्कृतीचा ठेवा
तरी मनामध्ये जपतोय

-Ads-

माझ्या देशाच्या मातीत
स्वाभिमान रुजतोय
देशप्रेमाचा अंकुर
तनामनात फुलतोय

माणूसकीचा धर्म
इथं प्रत्येकजण पाळतोय
ईश्वर, अल्लाह एकच
आता आम्ही मानतोय

माझा भारत आहे
स्वांतत्र्यसैनिकांची खाण
देशस्वांतत्र्यासाठी त्यागला
अनेकांनी प्राण

स्वातंत्र्याचा सूर्य
नवतेजाने तळपला
क्रांतीकारकांची पुण्याई
मोकळा श्वास मीळाला.

फुले, शाहू, छत्रपतींचा वारसा
अन् आंबेडकरांचे…संविधान,
राष्ट्रीय गित जागवत सदैव…
आम्हा “भारत देशाचा “आभिमान.

– रुपाली वैद्य-वागरे, नांदेड

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)