देशी गाईंसाठी “काऊ क्‍लब’

पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची संकल्पना
मुंबई – शेतकऱ्यांना कृषीपुरक उद्योग सुरू करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी उस्मानाबाद, पालघर जिल्ह्यात देशी गाईंचा “काऊ क्‍लब’ स्थापन करण्याबाबतची संकल्पना पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मांडली आहे.

केंद्र शासनाने नीती आयोगाची स्थापना करून देशात आकांक्षित जिल्ह्यांची निवड केली आहे. या माध्यमातून नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचे कार्य होत आहे. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याची निवड झाली असून या दोन बाबीचा संदर्भ घेवून राज्यमंत्री खोतकर यांनी शेतकऱ्यांकरिता कृषीपुरक उद्योग सुरू करण्यासाठी राज्यातील उस्मानाबाद, पालघर या दोन जिल्ह्यात देशी गाईंचा काऊ क्‍लब स्थापन करण्याबाबत संकल्पना मांडली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न सन 2022 पर्यंत दुप्पट करण्यासाठी योजनेचे स्वरुप तयार करून त्यास तात्काळ मंजुरी देण्याचे निर्देश त्यांनी विभागाला दिले आहेत. या योजनेची अंमलबजावणी लवकर करण्यात यावी आणि त्याचा थेट लाभ शेतकऱ्यांना व्हावा, असेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी, विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात तसेच मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियान योजना सुरू केली आहे.

काऊ क्‍लबची संकल्पना
काऊ क्‍लब या प्रस्तावित योजनेमध्ये उस्मानाबाद व पालघर जिल्ह्यांतील लाभार्थीनी सामुहिक तत्वावर व सामाईक पध्दतीने दुधाळ देशी गाईंचे पालन करुन दुग्धोत्पादन घेणे, या दुधावर आवश्‍यक संस्करण आणि प्रक्रिया करुन दूध तसेच दुग्धजन्य पदार्थ विशिष्ट ब्रॅंड विकसित करुन त्याची विक्री करणे याचा समावेश असणार आहे.

यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या सामाईक पध्दतीने गोसंगोपनातून उपलब्ध होणारे शेण आणि गोमुत्र यापासून विविध उत्पादन (उदा. जिवामृत, बिजामृत ईएम, सेंद्रीय खत, पंचगव्य, बायोफर्टीलायझर इ.) तयार करुन विशिष्ट ब्रॅंड प्रस्थापित करुन विक्री करणे, शेतकरी व पशुपालकांना आदर्श गोसंगोपन पध्दती, शेण व मूत्र यांच्यापासून उत्पादने इ. बाबींचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)