देशासाठी निःस्वार्थ काम करावे – ओमप्रकाश रावत

मंचर- निसर्ग जसा परोपकारी, निःस्वार्थी आहे, तसे विद्यार्थ्यानी समाज व देशासाठी निःस्वार्थीपणे काम करत राहावे, असे आवाहन वरिष्ठ प्रबंधक ओमप्रकाश रावत यांनी केले.
स्थापत्य हिंदुस्थान पेटोलियम कार्पोरेशन लि.कंपनीकडून घोडेगाव येथील बी. डी. काळे महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, जमाती व इतर मागास संवर्गातील 131 विद्यार्थ्यांना 7 लाख 17 हजार 800 रुपयांची शिष्यवृती मंजूर केली आहे. रकमेचा प्रतिकात्मक धनादेश वरिष्ठ प्रबंधक ओमप्रकाश रावत यांच्या हस्ते महाविद्यालयास नुकताच प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अजित काळे होते. हिंदुस्तान पेटोलियम कार्पोरेशन कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक मधुकर कैथा यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे संचालक जयसिंगराव काळे यांनी संस्थेने केलेल्या विनंतीनुसार महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थिनींसाठी अद्ययावत असे प्रसाधनगृह हिंदुस्तान कंपनीच्या निधीतून बांधून देण्याचेही मान्य केले आहे. याप्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष डॉ. विलास काळे, नंदाराम काळे आपले मनोगत व्यक्त केले. शिष्यवृती प्राप्त विद्यार्थी पुनम बांबळे, सिद्धेश पिंगळे,समीर गारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी समन्वय समितीचे अध्यक्ष संतोष भास्कर,संस्थचे उपाध्यक्ष तुकाराम काळे,कार्याध्यक्ष सुरेशशेठ काळे,खजिनदार शिवाजीराव घोडेकर,संचालक शिवदास काळे उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)