देशाला महान बनविण्यासाठी शिवचरित्रच पर्याय : बलकवडे

पुसेगाव दि. 15 (प्रतिनिधी) – या देशाची आजची अस्थिर अवस्था पाहता देशाला तारण्यासाठी तसेच महान बनवण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या चरित्राशिवाय पर्याय नाही, असे विचार प्रसिध्द इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी व्यक्त केले.
सेवागिरी देवस्थान ट्रस्टतर्फे आयोजीत व्याख्यानमालेत ते शिवरायांची राजनिती या विषयावर बोलत होते. यावेळी मठाधिपती सुंदरगिरी महाराज, सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, योगेश देशमुख, धनाजी मस्के, अनिकेत वाघ, प्राचार्य डॉ. संजय कांबळे उपस्थित होते. बलकवडे म्हणाले, परकीय आक्रमकांनी या देशाची लूट केल्यामुळे सतराव्या शतकात हा देश उध्वस्त झाला होता. या देशाच्या उत्थानासाठीच शिवरायांच्या जन्म झाला होता. त्यामुळेच शिवरायांच्या ठायी प्रभू रामचंद्रांचे चारित्र्य व भगवान कृष्णांची राजनिती एकवटली होती. अस्मानी व सुलतानी संकटामुळे पडीक झालेली राज्यातील साठ टक्के शेती लागवडीखाली आणण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना प्रवृत्त केले. त्यासाठी शेती लागवडीसाठी लागणारे साहित्य त्यांनी शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिले. मध्ययुगात शेतकऱ्यांना करमुक्त करणारा शिवराय हा पहिला राजा होय. शेती उत्पादनामुळे शेतकरी सधन झाला. परिणामी अठरा पगड जातीतील कारागीरांना रोजगार मिळाला. राजाने प्रजेचा पुत्रवत सांभाळ करावा, प्रजेला चांगले प्रशासन द्यावे, परकीय आक्रमणावेळी आपला धर्म, समाज, संस्कृती व प्रजेचे रक्षण करावे, अन्याय करणाराला कठोर शासन करावे या कर्तव्यांचे राजाने पालन केले पाहिजे. तसेच परकीय आक्रमणावेळी देशरक्षणासाठी प्रजेने राजाला सहकार्य करावे व आपल्या उत्पन्नाचा वाटा कर रुपाने द्यावा. शिवरायांच्या नितीनुसार राजाने व प्रजेने आपापल्या कर्तव्यांचे पालन केले तर हा देश निश्‍चितच महान बनेल. आदर्श प्रशासन व लोककल्याणकारी शासन ही शिवरायांची राजनितीच होती. त्यामुळेच त्यांनी अन्यायाविरुध्द सतत लढा दिल्याचे त्यांनी नमुद केले. मोहन गुरव यांनी सुत्रसंचालन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)