देशामध्ये रस्ते विकासाची कामे प्रगतीपथावर – नितीन गडकरी

नागपूर: मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे 79 व्या इंडियन रोड काँग्रेसचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी बोलत होते.

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले, देशामध्ये रस्ते विकासाची कामे प्रगतीपथावर असून दर्जेदार व कमी खर्चातील रस्ते बांधणीवर विशेष भर देण्यात येत आहे. इंडियन रोड काँग्रेसचे नागपूर येथील आयोजन नागपूरकरांसाठी गौरवास्पद ठरले असून ही परिषद वैशिष्ट्यपूर्ण आहे. रस्ते बांधणीच्या क्षेत्रातील विविध पैलूंवर यामध्ये विचारमंथन होणार असून यामध्ये सादर करण्यात आलेल्या संशोधनांचा निश्चितच उपयोग होणार आहे. रस्तेबांधणीच्या क्षेत्रात नवीन संशोधनामध्ये रस्ते बांधकामासाठी प्लॅस्टिक, काच व अन्य काही टाकाऊ वस्तूंचा उपयोग करुन घेण्यात येत आहे. रस्तेबांधणीत अनेकवेळा अपरिहार्यपणे झाडे कापावी लागतात. परंतु त्याहून अधिक वृक्ष लागवड करणे व झाडांची पुनर्स्थापन करणे यावर भर द्यावा लागेल.

जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जलसंधारणाच्या विविध कामातून निघालेल्या मुरुम आणि मातीचा रस्तेबांधणीसाठी उपयोग करुन घेण्यात येत आहे. रस्तेबांधणीबरोबरच रस्ते सुरक्षितता हा देखील महत्त्वाचा विषय असून दरवर्षी देशभरात अपघातात मोठ्या संख्येने बळी जातात. हे कमी करण्यासाठी संवेदनशीलतेने विचार करण्याची आवश्यकता असून अपघात टाळण्यासाठी अपघातप्रवण क्षेत्र व जागा कमी करणे यासारख्या विविध उपाययोजना कराव्यात. रस्तेबांधणी व रस्ते विकासाच्या क्षेत्रामध्ये ‘आयआरसी’ आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्था म्हणून उदयास येऊन रस्ते विकासात ती मानबिंदू ठरावी. रस्तेबांधणीच्या क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करुन परिपूर्ण नियोजनाद्वारे पारदर्शक, कालबद्ध व वेगवानपणे कामे करावी, असे आवाहनही गडकरी यांनी यावेळी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)