देशात 4 लाखापेक्षा अधिक भिकारी – केंद्रीय मंत्री गहलोत

नवी दिल्ली – भारतात 4 लाखांपेक्षा अधिक भिकारी असल्याची माह्तिी आज केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत यांनी लोकसभेत दिली आहे. भारत हा एक विकसनशील देश आहे, आणि भारतातील सुमारे 40 टक्के जनता दारिद्रय रेषेखाली असल्याचेही त्यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार भारतात एकूण 4,13,760 भिकारी आहेत. त्यात 2,21,673 पुरुष आणि बाकी महिला भिकारी आहेत. राज्यवार विचार करता पश्‍चिम बंगालमध्ये सर्वात अधिक तर लक्षद्वीपमध्ये सर्वात कमी भिकारी असल्याची माहिती देताना त्यांनी भिकाऱ्यांसंबंधी आकडेवारीच लोकसभेत सादर केली.

पश्‍चिम बंगालमध्ये सर्वाधिक 81 हजार भिकारी आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावरील 65,838 भिकारी असून त्यापैकी 41,859 पुरुष आणि 23,976 महिला आहेत. बिहारेमधील 29,723 भिकाऱ्यांपैकी 14,842 पुरुष व 14,881 महिला भिकारी आहेत. राजधानी दिल्लीत 2,187 भिकारी आहेत. मणिपूर आणि पश्‍चिम बंगालमध्ये पुरुषांपेक्षा महिला भिकाऱ्यांची संख्या अधिक असून दादरा नगर हवेली, दीवदमन व अंदमान-निकोबार येथे अनुक्रमे 19, 22 आणि 56 भिकारी आहेत.सर्वात कमी 2 भिकारी लक्षद्वीप बेटात असल्याची माहिती एका प्रश्‍नाच्या उत्तरात त्यांनी लोकसभेला दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)