‘हिंदुत्त्ववाद्यांची सत्ता असल्याने अनेकांची अडचण ; हिंदू धर्म तोडण्यासाठी कटकारस्थानं’

लखनऊ: सध्या देशात हिंदुत्त्ववाद्यांची सत्ता असल्याने अनेकांची अडचणी झाली आहे. केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे हिंदू समाज दुखावला गेला असल्याचे  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले. ते गुरुवारी विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) प्रयागराज येथे आयोजित केलेल्या धर्मसंसदेत बोलत होते.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्यानुसार शबरीमला मंदिरात जायचे असेल तर त्यांना जाऊन द्यावे. जर महिलांना प्रवेश नाकारण्यात आला तर त्यांना सुरक्षा देऊन मुख्य मार्गाने मंदिरात न्यावे, असे न्यायालयाने सांगितले. मात्र देशानंतरही महिलांना स्वत:हून मंदिरात जावेसे वाटत नाही. त्यामुळे काही गट श्रीलंकेतून महिलांना आणून मंदिरात घुसवत आहेत. या गटांना हिंदू धर्मात स्त्री-पुरुषांमध्ये फूट निर्माण करायची आहे. त्यासाठी विविध कट रचले जात आहेत. नवीन बेत आखले जात आहेत’

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तसेच हिंदू धर्म तोडण्यासाठी कटकारस्थानं शिजत असून भारताचे तुकडे करण्याच्या गोष्टी करणारे त्यासाठी नवीन बेत आखले जात असल्याचा आरोप भागवत यांनी केला आहे.

https://twitter.com/ANINewsUP/status/1090902305350635520

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)