देशात, राज्यात परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल 

प्रफुल्ल पटेल : सरकारच्या कारभाराबाबत जनतेत मोठी नाराजी

मुंबई – देशात आणि राज्यात परिवर्तनाच्या दिशेने सगळे पक्ष चर्चा करत आहेत. त्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीमध्ये समविचारी पक्ष समाविष्ट व्हावेत यादृष्टीने आमचीही चर्चा सुरु आहे. राज्या-राज्यातील पक्षांनी आघाडीला व्यवस्थित साथ दिली, तर राज्यात आणि देशामध्ये नक्कीच बदल होईल, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला.

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीस प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, खासदार प्रफुल्ल पटेल, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री गणेश नाईक, माजी मंत्री भास्करराव जाधव, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकारांशी बोलतांना ही माहिती दिली. केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभाराबाबत देशात आणि राज्यात मोठी नाराजी आहे. राज्यातील आणि देशातील शेतकरी, कामगार आणि युवक हे घटक नाराज आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यापार्श्वभूमीवर येत्या लोकसभा निवडणुकीत आमची काय भूमिका असावी यासंदर्भात चर्चा सुरु आहे, असे सांगतानाच दोन्ही कॉंग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे मोदी सरकार आता राफेल विमान खरेदीवरून अडचणीत आले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भंडारा-गोंदियाची जागा राष्ट्रवादीने जिंकली. तर पालघरमध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मतांच्या विभागणीमुळे ती जागा भाजपने जिंकली, असे पटेल म्हणाले.

मतदारांनी सरकार बदलवून दाखवले 
नुकत्याच पार पडलेल्या मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा या राज्यातील निवडणूकांमध्ये भाजपची जी नीती आहे, त्याविरोधात लोकांनी मतदान केले आणि सरकार बदलवून दाखवले आहे. या सगळया पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये सुध्दा हिच परिस्थिती समोर आहे. मोदींनी जी आश्वासने दिली होती. भ्रष्टाचारमुक्त भारत देणार होते. या सगळया गोष्टी लोकांना आता माहित झाल्या आहेत. त्या फक्त निवडणूकांमधील घोषणा होत्या, हे आता सिध्द झाले आहे आणि आता आपली फसवणूक झाल्याचे लोकांना कळून चुकले आहे. हाच मुद्दा घेवून त्यावर पक्षाच्या बैठकीमध्ये चर्चा सुरु असल्याचेही पटेल यांनी सांगितले. 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)