देशात मृत्यूचेही राजकारण केले जात आहे; सुषमा स्वराज यांची काँग्रेसवर टीका

नवी दिल्ली  : इराकमध्ये बेपत्ता झालेल्या ३९ भारतीयांच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज लोकसभेत निवेदन देत असताना विरोधकांनी गदारोळ घातला. त्यामुळे सुषमा स्वराज निवेदन देऊ शकल्या नाही. दरम्यान याप्रकरणी सुषमा स्वराज यांनी संताप व्यक्त केला असून, हे अत्यंत दुर्देवी आहे, काँग्रेस मृत्यूचे राजकारण करत आहे असे म्हटले. पत्रकार परिषदेत बोलताना सुषमा स्वराज यांनी घटनेची सविस्तर माहिती देत काँग्रेसवर टीका केली.

‘राज्यसभेत सर्वांनी अत्यंत शांत आणि संयमाने माझे निवेदन ऐकले. सर्वांनी मृतांना आदरांजलीदेखील वाहिली. मला वाटले लोकसभेतही असेच काहीसे होईल. मात्र गेल्या काही दिवसांपासून गोंधळ घालणा-या काँग्रेसने ज्योतीरादित्य सिंधिया यांच्या नेतृत्वात आजही गदारोळ घातला. हे अत्यंत दुर्देवी आहे’, असं सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे.

‘आज काँग्रेसने अत्यंत खालच्या पातळीचं राजकारण केले. कदाचित काँग्रेस अध्यक्षांना वरील सभागृहात गदारोळ कसा झाला नाही याचं आश्चर्य वाटले असावे, म्हणूनच मग त्यांनी सिंधिया यांना लोकसभेत गदारोळ घालायला सांगितले. मृत्यूचेही राजकारण केले जात आहे’, अशी टीका सुषमा स्वराज यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)