देशात ब्लू व्हेल गेमने घेतला आणखी एक बळी

मिदनापूर – रशियात उत्पन्न झालेला ब्लू व्हेल हा जीवघेणा ऑनलाइन गेम, स्वत:ला इजा पोहोचविण्याचे टास्क देत असतो. त्यामध्ये प्लेअरला जीवघेण्या स्टेप्स पूर्ण कराव्या लागतात. जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या या गेमचे लोन आता देशात पसरू लागले आहे. या गेमच्या वेडापायी आणखी एका 10 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पश्‍चिम बंगालमधील मिदनापूर येथील अंकन डे या मुलाने आत्महत्या केली आहे. या मुलाने ब्लू व्हेल गेमच्या सूचनांनुसार घराच्या बाथरुममध्ये स्वत:चे डोके प्लास्टिकच्या पिशवीत बांधून स्वत:च्या गळ्याभोवती नायलॉन दोरी आवळून आत्महत्या केली आहे.

अधिक माहिती अशी की, अंकन शनिवारी शाळेतून परत आला आणि संगणकासमोर बसला. त्याची आई दुपारच्या जेवणासाठी बोलावत होती. मात्र, तेव्हा त्याने तो अंघोळ करुन येत असल्याचो सांगितले. बराच वेळ झाला तरी अंकन बाहेर आला नाही. त्यामुळे बाथरुमचा दरवाजा तोडून पाहिले असता त्यावेळी अंकन बाथरुममध्ये डोक्‍याला प्लॉस्टिक पिशवी बांधून पडलेला दिसला. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. अशी माहिती अंकनचे वडील गोपीनाथ डे यांनी दिली आहे.

अंकनच्या मित्रांनी तो ब्लू व्हेल गेम खेळत असल्याचे सांगितले आहे. काही दिवसांपासून तो अस्वस्थ असायचा, शाळेतही त्याची वागणूक काहीशी बदलली होती, तो एकटाच असायचा त्याच्या या वर्तनाबद्दल त्याच्या आईलाही कळविण्यात आले असल्याची माहिती शाळेतील शिक्षकांकडून देण्यात आली. त्याने या गेमबद्दल त्याच्या मित्रांनाही सांगितलं असल्याचं समोर आले आहे. जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या ब्ल्यू व्हेल गेमवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)