देशात पुरुषांपेक्षा महिलांना १६.१ टक्के कमी पगार

नवी दिल्ली : भारतामध्ये महिलांची कमाई पुरुषांपेक्षा १६.१ टक्के कमी आहे. भारतात महिलांना पुरुषांपेक्षा जवळपास १६.१ टक्के वेतन कमी दिले जाते. कॉर्न फेरी जेंडर पे इंडेक्सच्या अहवालातून याबाबत माहिती समोर आली आहे.

जागतिक स्तरावरही पुरुषांपेक्षा जवळपास १६.१ टक्के वेतन महिलांना कमी दिले जाते. एकाच कंपनीमध्ये समकक्ष काम करणाऱ्या पुरुष आणि महिलेच्या वेतनातील फरक दीड टक्क्यांनी कमी आहे. तर सारखेच काम करणाऱ्यांमध्ये हे अंतर केवळ ०.५ टक्क्यांनी कमी होत आहे.

कॉर्न फेरी जेंडर पे इंडेक्सतर्फे, ५३ देशांतील १४ हजार कंपन्यांचा अभ्यास करण्यात आला. काही कंपन्यांमध्ये महिलांना सरासरीपेक्षाही कमी वेतन दिले जाते. भारतातील वेतन लिंगभेद हा शेजारच्या चीन पेक्षाही जास्त आहे. चीनचा १२.१ टक्के आहे. तर ब्राझीलसारख्या देशांध्ये हाच आकडा २६.२ म्हणजेच सर्वाधिक आहे. फ्रान्समध्ये १४.१, जर्मनी १६.८, यूकेमध्ये २३.८ आणि अमेरिकेमध्ये १७.६ आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)