देशात पायाभूत सुविधांचा अभाव

नवी दिल्ली – देशातील पायाभूत सुविधा पुरेशा दर्जेदार नसल्यामुळे भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नावर 14 टक्‍के परिणाम होत असल्याचे उद्योग आणि वाणिज्य राज्यमंत्री सी. पी. चौधरी यांनी सांगितले. पत्रकाराशी बोलताना ते म्हणाले की, देशातील रस्ते पुरेसे योग्य नसल्यामुळे त्याचा देशातील उत्पादनाच्या वाहतुकीवर परिणाम होतो. त्यामुळे उत्पादनाचा खर्च वाढतो. त्याचा निर्यातीवर परिणाम होत असतो. मात्र, आता सरकारने रस्त्यासह पायाभूत सुविधा वाढविण्याचे मनावर घेतले आहे. त्यासाठी नावीन्यपूर्ण उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे देशातील मोठ्या रस्त्याचा दर्जा सुधारण्यास मदत मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, बंदरांना मोठ्या शहरांशी जोडले जात आहे. त्याचबरोबर रेल्वे सेवेचा दर्जाही सुधारण्याचा प्रयत्न होत आहे. सागरमाला प्रकल्पामुळेही रस्त्याचा विकास वेगात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, यासाठी भांडवल नावीन्यपूर्ण पद्धतीने उभे केले जात आहे. देखभालीसाठी तोच प्रयोग करण्यात येत आहे. त्यामुळे मोठ्या शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होत आहेत. त्याचबरोबर जीएसटीमुळेही वाहतूक सुलभ होण्यास मदत मिळणार असल्याचे त्यांनी सिांगतले.

आता लवकरच भारतातील रस्ते, बंदरे आणि इतर पायाभूत सुविधा जागतिक दर्जाच्या होणार आहेत. त्यानंतर त्याआधारावर देशात विविध उद्योग विकसित होतील. त्याचबरोबर त्यांना कार्यक्षमतेने काम करता येईल. जीएसटीमुळे वाहतूकही वेगात होईल. त्यामुळे नजीकच्या काळात भारताची आर्थिक परिस्थिती वेगाने सुधारण्यास मदत होणार आहे. विविध राज्य आता आपल्या भागातील पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)