देशात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक भिकारी ;सरकारची माहिती

नवी दिल्ली : देश एकीकडे महासत्ता होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे तर दुसरीकडे याची विरुद्ध बाजू जगासमोर येत आहे. अर्थात देशभरातील भिकाऱ्याची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याविषयी माहिती सरकारकडून नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. देशातल्या भिकाऱ्यांची यादी सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांनी जाहीर केली आहे. गेहलोत यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक भिकारी आहेत. पश्चिम बंगाल पाठोपाठ उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि बिहार या राज्यांचा नंबर लागतो.

पश्चिम बंगालमध्ये एकूण ८१,२४४ भिकारी आहेत. यातले ३३,०८६ पुरुष तर ४८,१५८ महिला आहेत. उत्तर प्रदेशमध्ये ६५,८३५ भिकारी आहेत. यातले ४१,८५९ पुरुष आणि २३,९७६ महिला आहेत. आंध्र प्रदेशमध्ये ३०,२१८ भिकारी आहेत. यातले १६,२६४ पुरुष आणि १३,९५४ महिला आहेत. महाराष्ट्रामध्ये २४,३०७ भिकारी आहेत. यातले १४,०२० पुरुष आणि १०,२८७ महिला आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)