देशात जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सुरु : शरद पवार

जातीय शक्तिंविरोधात लढण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन 

मुंबई: देशातील नागरीकांनी पंडीत जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन पुढे जायला हवे. पण आज जाती-जातीमध्ये…धर्मा-धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे आणि गावागावात चुकीचे संदेश पोचवण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे देशात आज भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी भीती व्यक्त करत अशा जातीय शक्तीच्याविरोधात लढण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शरद पवार बोलत होते. पवार यांनी आपल्या भाषणामध्ये आजच्या देशातील सद्दय परिस्थितीवर भाष्य करतानाच याविरोधात देशातील जनतेने एकत्र येण्याचे आवाहन केले. देशातील मुस्लिम समाज आज भेटल्यानंतर मशिदीचा विषय काढू नका, असे सांगत आहेत. सत्ताधारी अयोध्येमध्ये राममंदीर बनवायला निघाले आहेत. परंतु आम्ही मंदीराच्याविरोधात नाही. आमचा न्यायालयावर विश्वास असून न्यायालय जो निर्णय देईल तो आम्ही मान्य करु, असे मुस्लिम समाज सांगत आहेत याकडे शरद पवार यांनी लक्ष वेधले.

शरद पवार यांनी आपल्या भाषणामध्ये देशाचे शिक्षणमंत्री राहिलेले मौलाना आझाद यांच्या दुरदृष्टीच्या कार्यावर प्रकाशझोत टाकला. आझाद यांच्यामुळे कला,साहित्य आणि सांस्कृतिक याच्यासह सर्वच क्षेत्रामध्ये नॅशनल इन्स्टियूट उभी करण्याचे काम झाले आणि त्यामुळे आज आपण इथपर्यंत पोचल्याचेही त्यांनी सांगितले.

शहरांची नावे बदल्याने समस्या सुटणार का? 
सद्या विविध राज्यातील शहरांची नावे बदलण्याचा पायंडा सुरु आहे. त्यावर बोलताना शरद पवार यांनी सरकारवर टीका केली. नावे बदलल्यामुळे बेरोजगारी सुटणार आहे का? असा सवाल करतानाच देशातील समस्यांकडे दुर्लक्ष करुन त्याकडील लक्ष विचलित करण्याचे काम केले जात आहे. देशासमोर बेरोजगारी,गरीबी अशा समस्या असताना नाव बदलण्याची गरज नाही. सत्ताधारी लोकांना चुकीच्या रस्त्यावर नेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)