देशात ‘जागतिक वन दिन’ साजरा

नवी दिल्ली : आज जागतिक वन दिन साजरा केला जात आहे. लोकांच्या मनावर वनाचे आणि झाडांचे महत्त्व ठसावे, यासाठी हा दिवस साजरा केला जातो. पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळाच्या दोन तृतियांश एवढे क्षेत्रफळ पाण्याने व्यापलेले आहे. उर्वरित जमिनीचा एक तृतियांश भाग जंगलांनी व्यापलेला असला पाहिजे, अन्यथा पृथ्वीचे पर्यावरण बिघडते, असा संकेत आहे. परंतु एवढी जंगले जतन करण्याचे तारतम्य माणसाला सुचलेले नाही.

जंगले वेगाने कमी होत आहेत. त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे. कार्बन वायू शोषून घेण्याची ही व्यवस्था नष्ट झाल्यामुळे हवेतले कार्बन वायूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जागतिक तापमान वाढीचे संकट समोर आले आहे. या सगळ्यातून मार्ग काढायचा असेल तर जंगले टिकली पाहिजेत आणि वरचेवर झाडांची लागवड झाली पाहिजे. हा संदेश देण्यासाठी आजचा दिवस सर्व स्तरातून साजरा करण्यात येतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)