देशात चौथी औद्योगिक क्रांती 

संग्रहित छायाचित्र
डॉ. चांद : रोजगार निर्मितीत वाढ होण्याची गरज 
नवी दिल्ली: नाल्को म्हणजेच नॅशनल ऍल्युमिनिअम कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. तपन कुमार चांद यांना यंदाचा प्रतिष्ठित एनआयपीएम रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. एनआयपीएम म्हणजेच राष्ट्रीय कर्मचारी व्यवस्थापन संस्थेच्या पुणे येथे झालेल्या 37 व्या राष्ट्रीय परिषदेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लोक व्यवस्थापन आणि नेतृत्व कौशल्य या क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले. डॉ. चांद यांनी आपला पुरस्कार देशभरातील मनुष्यबळ क्षेत्रातल्या व्यावसायिकांना आणि नाल्कोच्या चमूला समर्पित केला.
सध्या चौथी औद्योगिक क्रांती येऊ घातली आहे. यात कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंक्‍स, रोबोटिक्‍स, ऑग्युमेंटेड रिऍलिटी अशा क्षेत्रात आपल्याला शिरकाव करायचा आहे. या क्रांतीमुळे भांडवली गुंतवणुकीत लक्षणीय घट होणार असून जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारतीय उद्योग क्षेत्राला या क्रांतीसाठी स्वत:ला सक्षम बनवावे लागेल. भारतासाठी मोठी लोकसंख्या असलेल्या देशात चौथ्या क्रांतीमुळे रोजगाराच्या संधी कमी होणे आव्हान असेल आणि त्याचा फटका मोठ्या आणि मध्यम उद्योग क्षेत्राला बसू शकतो. त्यामुळे मनुष्यबळ व्यवसायाने मध्यम, लघू आणि सूक्ष्म क्षेत्रातील संधींकडे लक्ष द्यावे आणि त्यासाठी रोजगार व्यवस्था निर्माण करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)