देशात आठवीपर्यंत आता हिंदी भाषा अनिवार्य ?

नवी दिल्ली – देशात अनेक ठिकाणी असणारे पुस्तकी अभ्यासक्रम वेगवेगळे असतात. परंतु, सरकारने समितीची शिफारसी मंजूर केल्या तर संपूर्ण देशात विज्ञान आणि गणित विषयाचा अभ्यासक्रम एकच राहणार आहे. शिवाय आठवीपर्यंत हिंदी हा विषयही अनिवार्य होणार आहे. सध्या बिगरहिंदी राज्यांमध्ये म्हणजेच तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, गोवा, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये हिंदी अनिवार्य नाही.

या शिफारशी नऊ सदस्यीस कस्तुरीरंगन समितीने केल्या आहेत. या समितीचे गठन शाळेत ‘भारत केंद्रित आणि वैज्ञानिक’ शिक्षण प्रणाली लागू करण्यासाठी केले होते. समितीने नवीन शिक्षा नीतीवर आधारित शिफारशी केल्या आहेत. यामध्ये कौशल्यावर आधारित शिक्षणावर भर देण्याचीही शिफारस करण्यात आली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, कस्तुरीरंगन समिती आपला अहवाल ३१ डिसेंबर रोजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला सोपविला आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)