देशातील 30 टक्के वाहन परवाने बोगस

नितिन गडकरी: मोटार वाहन कायद्यात बदल प्रस्तावित
नागपूर- आरटीओ कार्यालयांमध्ये वाहनांना परवाने कसे दिले जातात आणि कसा भ्रष्टाचार होतो, याची सर्व माहिती मला आहे. आरटीओ कार्यालयामधील हे भ्रष्ट कारभार थांबविण्याचे माझे उद्दिष्ट आहे. मात्र, भ्रष्ट आरटीओ अधिकारी काही खासदारांकडून लॉबिंग करून तसे होऊ देत नाहीत, असा गौप्यस्फोट केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. तर देशातील 30 टक्के वाहन परवाने बोगस असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

नागपुरात ऑटो डीलर्स संघटना फाडा म्हणजेच फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल्स डीलर्स एसोसिएशनच्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. गडकरी म्हणाले, कोणतीही शहानिशा न करता बोगस वाहन परवान्यांमुळे देशात दरवर्षी 5 लाख अपघात होतात. यामध्ये जवळपास दीड लाख वाहनचालकांचा मृत्यू होत असल्याची माहिती त्यांनी दिली.
आरटीओ कार्यालय आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील भ्रष्ट कारभार थांबविण्यासाठी मोटार वाहन कायद्यात केंद्र सरकारने काही बदल प्रस्तावित केले आहे. याबाबतचे विधेयक लोकसभेतून मंजूर झाले असून येत्या अधिवेशनात ते राज्यसभेत मंजूर होईल, असा विश्वास ही गडकरी यांनी व्यक्त केला.

-Ads-

सध्या सरकार मिथेनॉलला डिझेलचा पर्याय बनवून मोठ्या वाहनांचा परिचालन मिथेनॉलवर करण्याच्या योजनेवर काम करत आहे. लवकरच मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि गुवाहाटी येथे 10 बसेस पूर्णपणे मिथेनॉलवर चालविल्या जाणार, अशी माहिती गडकरी यांनी दिली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)