देशातील 19 कोटी लोक अजूनही बॅंक खात्याविना

नवी दिल्ली  -सरकारची जन धन योजना यशस्वी झाली, तरी अद्याप देशातील 19 कोटी नागरिकांजवळ अजूनही कोणतेही बॅंक खाते नाही. चीननंतर ही सर्वात मोठी लोकसंख्या आहे, असे जागतिक बॅंकेने म्हटले.जागतिक बॅंकेने आपल्या अहवालात सरकारच्या जन धन योजनेची प्रशंसा केली आहे. गेल्या काही वर्षांत देशातील निम्मी बॅंक खाती निष्क्रीय असल्याचे सांगण्यात आले आहे. मार्च 2018 पर्यंत जन धन योजनेंतर्गत 31 कोटी बॅंक खाती उघडण्यात आली आहेत. 2011 पासून बॅंक खाती असणाऱ्या नागरिकांच्या संख्येत दुप्पट वाढ होत 80 टक्‍क्‍यांवर पोहोचली आहे.

जागतिक पातळीवर बॅंक खाती नसलेल्यांमध्ये भारताचा हिस्सा 11 टक्‍के आहे. जगातील 3.8 अब्ज लोकांचे बॅंक खाते आहे. 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर 51 टक्‍के असणारे प्रमाण आता 62 टक्‍क्‍यांवर पोहोचले. जागतिक पातळीवर अजूनही 1.7 कोटी लोकांकडे बॅंक खाते नसून मोबाइलच्या वापराने ते आर्थिक सेवांचा लाभ घेऊ शकतात असे म्हणण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)