देशातील सर्वाधिक नव्या बनावट नोटा गुजरातमधून जप्त

नवी दिल्ली –  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबर २०१६रोजी देशात नोटबंदीची  घोषणा केली होती. त्यानंतर ५०० आणि २००० रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणल्या गेल्या. मात्र नोटबंदी पासून ते आतापर्यंत नव्या  बनावट नोटा जप्त केल्याचे अनेक प्रकरणे समोर आली आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणात गुजरात अव्वल स्थानी आहे.

जानेवारी २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत गुजरातमधून ५०० आणि दोन हजार रुपयांच्या सर्वाधिक बनावट नोटा जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जानेवारी २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत संपूर्ण देशातून ६.७७ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. त्यात गुजरातममध्ये २.३१ कोटी रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या आहेत

तर मिझोराम दुसऱ्या स्थानावर असून तिथून १.२३ कोटी रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. . एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत संपूर्ण भारतातून ५०० रुपयाच्या २५,५६८ आणि २ हजाराच्या ३३,३०४  बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
2 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)