देशातील सद्यपरिस्थिती आर्थिक आणीबाणीचे द्योतक-डेरेक ओब्रायन

नवी दिल्ली: देशात काही राज्यांमध्ये अचानकपणे आर्थिक चणचण निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. नोटबंदीच्या निर्णयानंतर 50 दिवसांमध्ये देशातील परिस्थिती पूर्ववत होईल, असा दावा त्यावेळी मोदींनी केला होता. मात्र, आता दीड वर्ष उलटूनही ही समस्या कायम आहे. ही परिस्थिती म्हणजे देश आर्थिक आणीबाणीत सापडल्याचे द्योतक आहे, अशी टीका डेरेक ओब्रायन यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर देशभरात पैशांची चणचण निर्माण झाली होती. एटीएममध्ये पैशांचा खडखडाट असल्याने पैसे काढण्यासाठी बँकांच्या बाहेर रांग लावावी लागत होती. आता पुन्हा नोटाबंदीमध्ये जी परिस्थिती होती त्याचीच पुनरावृत्ती होताना दिसते आहे.

-Ads-

आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून एटीएममध्ये पैशांचा तुटवडा पाहायला मिळतो आहे. याचबरोबर पूर्व महाराष्ट्र, बिहार आणि गुजरातमध्येही कॅश कमी असल्याच्या तक्रारी समोर आल्या. दिल्ली-एनसीआरमध्येही लोकांना एटीएममध्ये चकरा माराव्या लागत आहेत. तसेच गुडगावमधील 80 टक्के एटीएम कॅशलेस झाले आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)