देशातील लोकांनी काय पाहावे ‘हे’ लोक कसे ठरवू शकतात?-नंदिता सेन

जयपूर : स्वत:ला संस्कृतीरक्षक म्हणवून घेणारी मूठभर मंडळी आणि देशातील लोकांनी काय पाहावे आणि काय पाहू नये, हे कसे काय ठरवू शकतात असा सवाल ज्येष्ठ अभिनेत्री व चित्रपट निर्मात्या नंदिता सेन यांनी केला आहे.  दरम्यान, हा प्रकार अतिशय चिंताजनक असल्याचेही प्रतिपादन त्यांनी केलस आहे. ‘पद्मावत’च्या निमित्ताने झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जयपूर लिटरेचर फेस्टिवलमध्ये हे वक्तव्य केले.

सध्याची सेन्सॉरची पद्धत चुकीची आहे. काही मंडळींनीच कलाविष्कारातील काय योग्य व काय अयोग्य ठरवणे आणि त्यांना योग्य वाटेल, तेच लोकांपुढे जाईल, अशी व्यवस्था करणे हे पूर्णपणे अयोग्य आहे. कला ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम कलाकार करीत असतात, पण कलेचा अविष्कारात अडथळे आणण्याचे प्रकार वाढत असून, ही बाब चिंताजनक आहे.

-Ads-

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर याप्रकारे घाला आणणे, हे लोकशाहीलाच घातक आहे, असे त्या म्हणाल्या. या निमित्ताने त्यांनी सादत हसन मंटो या प्रख्यात साहित्यिकावरील आपल्या ‘मंटो’ चित्रपटाचाही उल्लेख केला. त्या चित्रपटात प्रमुख भूमिका बजावणारे नवाजुद्दिन सिद्दिकी हेही या वेळी उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)