देशातील रेल्वे व्यवस्थापनाचा साफ बट्ट्याबोळ

चिदंबरम यांनी केला आकडेवारीसह दावा
नवी दिल्ली – देशातील रेल्वे व्यवस्थापनाचा साफ बट्ट्याबोळ झाला आहे असे रेल्वेच्या आकडेवारीवरूनच स्पष्ट झाले आहे असा दावा माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की रेल्वेचा कारभार कसा चालला आहे हे ऑपरेटिंग रेशोच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. त्यानुसार सन 2017-18 या वर्षातील रेल्वेचा ऑपरेटिंग रेशो हा साफ कोलमडला असून रेल्वे व्यवस्थापनाचे तीनतेरा झाले आहेत असे चिदंबरम यांनी म्हटले आहे.

त्यांनी या संबंधात ट्विटरवर सरकारला विचारले आहे की ऑपरेटिंग रेशो हा शंभर टक्‍क्‍यांपेक्षा अधिक झाला आहे हे खरे आहे काय? या आकडेवारीत मखलाशी करून तो शंभर टक्‍क्‍यांच्या आत असल्याचे दाखवण्याचा खटाटोप सरकारने केला आहे हे खरे आहे काय? त्यांनी म्हटले आहे की रेल्वेच्या कागदपत्रांत हा ऑपरेटिंग रेशो शंभर टक्‍क्‍यांच्या अगदी किंचित कमी आहे. वस्तुत: तो शंभर टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असून हे भारतीय रेल्वे व्यवस्थापनाचे व्यापक अपयश दाखवते आहे.

सन 2017-18 च्या रेल्वेच्या आकडेवारी नुसार रेल्वेचा ऑपरेटिंग रेशो 98.5 इतका झाला आहे. रेल्वेची ही सर्वात नीचांकी कामगीरी आहे. सन 2001-2 हे वर्ष रेल्वेसाठी सर्वात दारूण वर्ष ठरले होते. तरीही त्या वर्षीचा ऑपरेटिंग रेशो 98.3 टक्के इतका होता. यंदा त्याही पेक्षा भीषण कामगीरी नोंदवली गेली आहे असे चिदंबरम यांनी निदर्शनाला आणून दिले आहे. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर रेल्वेने म्हटले आहे की कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांना सातवा आयोग लागू करण्यात आल्यामुळे रेल्वेच्या आर्थिक स्थितीवर भार आला असून त्यामुळे रेल्वेचा ऑपरेटिंग रेशो खालवला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)