देशातील राज्यपाल आता व्हाईसरॉय सारखे वागू लागले – चिदंबरम 

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चर्चेच्या प्रक्रियेविषयी मतप्रदर्शन करण्याचा राजकीय पक्षांना अधिकार नाही असे प्रतिपादन जम्मू काश्‍मीरचे नवे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केले आहे त्यावर कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनी जोरदार टीका केली आहे. या देशातील राज्यपाल आता ब्रिटीश काळातील व्हाईसरॉय सारखे वागू लागले आहेत असा आरोप त्यांनी केला आहे.

या संबंधात ट्विटर वर आपली प्रतिक्रीया नोंदवताना चिंदबरम यांनी म्हटले आहे की जम्मू काश्‍मीरच्या राज्यपालांनी भारत-पाक चर्चेच्या संबंधात राजकीय पक्षांना मतप्रदर्शनापासून रोखणे याचा अर्थ आता त्यांना देशात पक्ष विरहीत लोकशाही हवी आहे किंवा लोकशाहीच नको आहे. ब्रिटीश राजवटीत लॉर्ड माऊंटबॅटन हे शेवटचे व्हाईसरॉय होते असे आम्हाला सांगितले गेले होते पण ते चुक आहे कारण केंद्र सरकारने नेमलेले सर्व गव्हर्नर्स आणि लेफ्टनंट गव्हर्नर्स आता व्हाईसरॉय म्हणून काम करीत आहेत असा टोमणाही त्यांनी मारला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जम्मू काश्‍मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी बुधवारी असे प्रतिपादन केले होते की जेव्हा भारत आणि पाक यांच्यात चर्चेचा विषय येतो त्यावेळी तो दोन सरकार मधील चर्चेचा विषय असतो त्यात पीडीपी किंवा नॅशनल कॉन्फरन्स यांच्या सारख्या राजकीय पक्षांनी ढवळाढवळ करण्याची गरज नाही त्यावर चिदंबरम यांचा हा आक्षेप आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)