देशातील महिलांना न्याय कधी मिळणार? – सुप्रिया सुळे

मुंबई: हरियाणामध्ये राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित विद्यार्थिनीवर पाच जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. महिंद्रगड जिल्ह्यातील कनिना गावात बुधवारी ही घटना घडली. वृत्तानुसार, पाच कथित आरोपींनी पीडितेला अंमली पदार्थ खाण्यास देऊन तिचे अपहरण केले आणि तिच्यावर बलात्कार करून तिला बस स्टॅण्डवर सोडून फरार झाले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारला जाब विचारला आहे. सुळे म्हणाल्या, “हरियाणामध्ये सीबीएसई टॉपर तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. देशात बलात्काराच्या घटना वाढतच आहेत. देशातील महिलांना न्याय कधी मिळणार? सरकारने कायदे केले आहेत, मात्र त्या कायद्यांची अमलबजावणी होतेय का? पंतप्रधान महोदय ! यावर मौन सोडून उत्तर द्या!”

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, महाराष्ट्रातही जवळपास तीन हजार महिला बेपत्ता आहेत. दिवसेंदिवस ही संख्या वाढतेच आहे. दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे आमदार मुलींच्या अपहरणाची भाषा वापरत असूनदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याबाबत एक शब्दही काढत नाहीत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)