देशातील महत्वाच्या 91 धरणातल्या जलसाठ्यांमध्ये एक टक्‍क्‍याने घट

नवी दिल्ली – देशातील महत्त्वाच्या 91 धरणातल्या जलसाठ्यांमध्ये 19 एप्रिल 2018 रोजी संपलेल्या सप्ताहामध्ये एक टक्क्‌याने घट झाली आहे. या जलसाठ्यांमध्ये 38.989 अब्ज घनमीटर पाणी उपलब्ध आहे. जलसाठ्यांच्या एकूण क्षमतेपैकी 24 टक्के जलसाठा आहे. गेल्यावर्षीच्या याच कालावधीतील साठ्याच्या 84 टक्के इतका हा साठा आहे.
या जलसाठ्यांची एकूण साठवणूक क्षमता 161.993 अब्ज घनमीटर इतकी आहे. 91 पैकी 37 जलसाठ्यांवर 60 मेगावॅट पेक्षा जास्त क्षमतेचे जल विद्युत प्रकल्प उभारण्यात आले आहेत.

पश्‍चिम विभागात महाराष्ट्र आणि गुजरातचा समावेश असून यामध्ये 27 धरणांचा समावेश आहे. त्यांची एकूण जल साठवण क्षमता 31.26 अब्ज घनमीटर आहे. या साठ्यांमध्ये सध्या 8.02 अब्ज घनमीटर पाणी उपलब्ध आहे. धरणांच्या साठवणूक क्षमतेपैकी 26 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

राजस्थान, पश्‍चिम बंगाल, त्रिपुरा, महाराष्ट्र, उत्तराखंड, आंध्र प्रदेश-तेलंगण, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला जलसाठा उपलब्ध आहे. मात्र, पंजाब, झारखंड,हिमाचल प्रदेश, ओडिशा, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांतील जलसाठ्यांमधील पाण्याचे प्रमाण गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)