देशातील बँकांना गंडा घालणाऱ्यांसाठी लवकरच विधेयक मांडणार – राजनाथसिंह

दीव : देशातील बँकांमध्ये कोट्यवधीचा घोटाळा करून देश सोडून गेलेल्या नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्याविषयी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आपले मत मांडले आहे. देशातील बँकांना गंडा घालून फरार झालेल्या लोकांसाठी केंद्र सरकार एक नवीन विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. यामुळे देशाची आर्थिक फसवणूक करणाऱ्यांना लगाम लावण्यासाठी मदत होणार असल्याचे राजनाथसिंह यांनी यावेळी म्हटले.

राजनाथसिंह आज दीवच्या दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी आर्थिक गुन्ह्याविषयीच्या महत्वाची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी अगोदर लोक देशाला आर्थिक गंडा घालून फरार होत होते आणि त्यांची संपत्ती जप्त करण्यात येत नव्हती मात्र आता असे न होता यापुढे अशा लोकांची संपत्ती लगेच जप्त करण्यात येणार असल्याचे म्हटले. तसेच त्यांनी देशातील शांतता नष्ट करण्यासाठी शेजारील राष्ट्र वेळोवेळी प्रयत्न करत असल्याचा आरोपदेखील राजनाथसिंह यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)