देशातील प्रमुख हायकोर्टांची नावे बदलण्याचे विधेयक लवकरच 

नवी दिल्ली: देशातील शहरांची नावे बदलण्यापाठोपाठ आता देशातील काही प्रमुख उच्च न्यायालयांची नावेही बदलण्याचा घाट केंद्र सरकारकडून घातला जाणार आहे. मद्रास, कलकत्ता आणि बॉम्बे हायकोर्टांची नावे बदलण्याचे विधेयक लवकरच संसदेत मांडले जाणार आहे. कलत्ता, मद्रास आणि बॉम्बे हायकोर्टांची नावे बदलून अनुक्रमे कोलकाता, चेन्नई आणि मुंबई हायकोर्ट असे करण्यासाठीचे विधेयक 19 जुलै 2016 रोजी लोकसभेमध्ये मांडण्यात आले होते. मात्र तामिळनाडू सरकारने मद्रास हाय कोर्टाचे नाव “हायकोर्ट ऑफ मद्रास’ ऐवजी “हायकोर्ट ऑफ तामिळनाडू’ असे करण्याविषयी सरकारकडे विचारणा केली होती. तर पश्‍चिमबंगाल सरकारलाही “कलकत्ता हायकोर्टा’चे नाव “कोलकाता हायकोर्ट’ असे व्हावे असे वाटत होते. सरकारच्या विधेयेकामध्ये सुचवण्यात आलेल्या नावाशी कलकत्ता उच्च न्यायालय सहमत नव्हते.

संबंधित राज्यसरकार आणि उच्च न्यायालयांची मते लक्षात घेऊन या जुन्या विधेयकात सुधारणा करून ते नव्याने लोकसभेमध्ये मांडण्यात येईल असे राज्यमंत्री पी.पी. चौधरी यांनी डिसेंबर 2016मध्ये लोकसभेमध्ये दिलेल्या एका लेखी उत्तरात सांगितले होते. त्यानुसार येत्या हिवाळी अधिवेशनात हे सुधारित विधेयक मांडण्यात येईल, असे विधी मंत्रालयाच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)