देशातील आधार कार्डचा डाटा पूर्णपणे सुरक्षित-युआयडीएआय

नवी दिल्ली : भारतीय नागरिकांचा आधारच्या माध्यमातून गोळा करण्यात आलेला डाटा पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण ‘युआयडीएआय’चे सीईओ अजयभूषण पांडेय यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुरक्षा तंत्र दाखवणारी पीपीटी सादर केली. केंद्र सरकारच्यावतीने त्यांनी हा सर्व डाटा सेंट्रल आयडेंटिटीज रिपॉजिटरीच्या भिंतीमध्ये सुरक्षित असल्याचे सांगितले आहे.

केंद्र सरकारची बाजू मांडताना ऍटर्नी जनरल के. के. वेणूगोपाल यांनी आधार योजनेचे समर्थन केले आहे. आधारमुळे केवळ विविध शासकीय योजनांचा खऱया लाभार्थ्यांना लाभ मिळणार असे नाही तर यामुळे अनेक योजनांमध्ये पारदर्शकता येऊन भ्रष्टाचार संपुष्टात येण्यास आणि रोखण्यास मदत होणार असल्याचा दावा केला आहे. प्रशासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचारामुळे खऱ्या लाभार्थीपर्यंत मदत पोहोचत नव्हती. परंतु आता ही परिस्थिती बदलली असल्याचे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)