देशातील अराजकतेला पशूहत्या जबाबदार!

जैन मुनी अक्षयसागर महाराजांचा दावा; गोहत्या थांबविण्याचा आग्रह
कोपरगाव  -भारत हा संस्कृतीप्रधान देश आहे. येथे सर्वधर्मसमभाव रुजविणारी परंपरा आहे. या देशात गोमातेची कत्तल करणे महापाप आहे. ही हत्या थांबवली, तरच अहिंसा परमोः धर्म टिकू शकेल, असे प्रतिपादन दिगंबर जैन समाजाचे मुनी अक्षयसागर महाराज यांनी केले. सध्या देशात जी अराजकता, भूकंप, त्सुनामी, महापूर, बलात्कार अत्याचार वाढीस लागले आहेत, त्याचे मूळ कारण पशूहत्या असल्याचे त्यांनी ठासून सांगितले.
तहसील कार्यालयानजीक असलेल्या मैदानावर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व जागतिक अहिंसा दिननिमित्त आयोजित केलेल्या सर्वधर्मिय अहिंसा महासंमेलनात ते “अहिंसा विश्वधर्म’ या विषयावर बोलत होते.
अक्षयसागर महाराज म्हणाले, की देशात सर्व जाती, जमातीचे लोक गुलदस्त्याप्रमाणे एकत्रित राहत आहेत. सर्वांच्या सहकार्याने प्रत्येक धर्माचा सुगंध दरवळत असल्याने येथे एकोपा नांदत आहे; मात्र काही समाज कंटक व दुर्जन लोक गालबोट लावीत आहेत. देशात संत, महंत, विविध पंथ मोठ्या प्रमाणावर आहे; मात्र जिथे अहिंसा, हिंसाचार आहे, तेथे आम्ही सर्व एक आहोत, असा संदेश त्यांनी भगवान महावीर यांचा “जिओ ओर जिने दो’ व हिंदू बांधवांचा जगा आणि जगू द्या हा मूलमंत्र प्रत्येकाने आचरणात आणला, तरच हिंसेला फाटा मिळू शकतो. मनुष्याच्या जीवनात ग्रंथ हेच गुरू असून जगात शांतता नांदावी, यासाठी प्रत्येकाने अहिंसावादी तत्वे जीवनात जोपासावी. जनावरांची सर्रास कत्तल होत असल्याबाबत त्यांनी भारत सरकारवर कडाडून टीका केली. एकीकडे जनावरांच्या कत्तलीसाठी परवानगी दिली, अंड्याला शाकाहाराचा दर्जा दिला अशा स्थितीत जो मनुष्य मांसाहार, दारूचे सेवन करतो तो मनुष्य कधीही सात्विक राहू शकत नाही, असे ते म्हणाले. प्रत्येकाने मांसाहार टाळा, पशूधन वाचवा, तरच अखंड हिंदुस्तानमध्ये शांतता राहू शकेल, असे ही ते म्हणाले.
या वेळी सरलाबेटचे मठाधिपती रामगिरी महाराज, संत जनार्दन स्वामी आश्रमाचे रामेशगिरी, भदंत आनंद सुमंश्री, अली पब्लिक स्कूलचे अध्यक्ष मौलाना अन्वर खान नदवी, श्वेतांबर समाजाच्या म.सा आराधना, श्रीकृष्ण आश्रमाचे दामोदर बाबा महानुभाव, सिद्धेश्वर देवस्थानचे शिवानंदगिरी यांची अहिंसा तत्वावर मौलिक मार्गदर्शने झाली. या वेळी फादर खेडेकर, संत देवानंद महाराज,गुरुद्वाराचे बाबा हरजितसिंग उपस्थित होते. प्रारंभी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या उपस्थित दीपप्रज्वलन करण्यात आले. कैलास ठोळे यांनी स्वागत केले. नितीन कासलीवाल यांनी आभार मानले. या वेळी “गोरक्षनाम राष्ट्र वर्धनम’ या पुस्तकाचे प्रकाशन संत, महंताच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमास नगराध्यक्ष विजय वहाडणे, आशुतोष काळे, राजेश परजणे, पराग संधान, शरद थोरात, दीपक गायकवाड आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)