देशातील अनेक राज्यात पावसाचे थैमान; मृतांचा आकडा ७७४ वर

नवी दिल्ली- अतिवृष्टीमुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. केरळनंतर आता हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्येही पावसाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. गृहमंत्रालयानुसार, अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे आतापर्यंत सात राज्यांमध्ये ७७४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशसह १६ राज्यांमध्ये हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. यादरम्यान अमरनाथ यात्राही थांबविण्यात आली आहे.

गृहमंत्रालयाच्या नॅशनल इमर्जन्सी रिस्पॉन्स सेंटर (एनईआरसी)नुसार, पूर आणि मुसळधार पावसामुळे केरळमध्ये १८७, उत्तर प्रदेशमध्ये १७१, पश्चिम बंगालमध्ये १७० तर महाराष्ट्रात १३९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. शिवाय गुजरात ५२, आसाम ४५, आणि नागालँडमध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय अनेक राज्यांमध्ये पावसामुळे २४५ जण जखमी झाले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, केरळमध्ये अतिवृष्टीमुळे ३९ जणांचा मृत्यू झाला असून ८,३१६ कोटींच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. तर १० हजार किमीपेक्षा अधिक रस्त्यांचे नुकसान झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)