देशातल्या परिवर्तनासाठी स्त्री शक्तीचे मोठे योगदान – पंतप्रधान

मुंबई – देशात आणि समाजात आज असलेल्या सकारात्मक परिवर्तनात देशाच्या स्त्री शक्तीचे मोठे योगदान आहे. स्त्रीशक्ती आद्य भूमिका बजावत नव-नवी शिखरे काबीज करत असून, स्त्री शक्ती अपार आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्त्रीशक्तीचा गौरव केला आहे. आकाशवाणीच्या “मन की बात’च्या या वर्षाच्या पहिल्या भागाद्वारे संवाद साधताना पंतप्रधानांनी देशातल्या महिला सर्वच क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत असून, राष्ट्राचे नाव उज्वल करत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

महिलाशक्ती, कुटुंबाला आणि समाजाला घट्ट बांधुन एकसंध ठेवण्यात मोलाचे कार्य करतात, असे पंतप्रधान म्हणाले. अंतराळवीर कल्पना चावला यांना आपण अकाली मुकलो ही दु:खाची बाब आहे, मात्र त्यांचे जीवन, त्यांचे कार्य हे जगभरातल्या युवा महिलांना एक संदेशच आहे.

-Ads-

मुंबईमधले माटुंगा रेल्वेस्थानक, महिला कर्मचाऱ्यांद्वारे चालवले जाणारे देशातले पहिले स्थानक असल्याबद्दल गौरवोद्गार काढतानाच प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सीमा सुरक्षा दलाच्या चमूने सदर केलेल्या चित्तथरारक प्रात्यक्षिकात महिलांचाही समावेश असल्याचा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला, छत्तीसगडमधल्या नक्षलप्रभावित दंतेवाडा भागातल्या आदिवासी महिला ई-रिक्षा चालवून स्वयंपूर्ण होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

स्वत:मध्ये स्वत:च सुधारणा घडवून आणण्यासाठी अथक प्रयत्न हे आपल्या समाजाचे वैशिष्ट्‌य आहे, असे सांगून समाजातल्या वाईट प्रथा नष्ट करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध होण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.
बाजारात उपलब्ध असलेल्या नामांकित कंपन्याच्या औषधांपेक्षा पन्नास ते नव्वद टक्‍यापेक्षा स्वस्त दरात औषधे, तीन हजारापेक्षा जास्त जनऔषधी केंद्रात उपलब्ध आहेत, यामुळे माफक दरात आरोग्यसेवा मिळण्यासाठी मदत होत आहे. आरोग्यपूर्ण आणि संपन्न भारत निर्माण होण्यासाठी गरीबांना माफक दरात दर्जेदार आरोग्यसुविधा उपलब्ध व्हाव्यात असा यामागचा उद्देश आहे.

सामूहिक चळवळीद्वारे मोठे सामाजिक परिवर्तन घडू शकते, असेही पंतप्रधान म्हणाले. पद्म पुरस्कारात आता पारदर्शकता आणली असून, गेल्या तीन वर्षात संपूर्ण प्रक्रिया बदलली आहे. नागरिक आता देशातल्या कोणत्याही व्यक्तीची पद्म पुरस्कारासाठी शिफारस करु शकतात, असेही त्यांनी सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)