देशातच होणार वापरकर्त्याच्या माहितीची साठवणूक 

नवी दिल्ली: ऑनलाईन रिटेल कंपन्या आणि सोशल मीडिया कंपन्यांना भारतीय वापरकर्त्यांचा डेटा देशातच ठेवावा लागण्याची शक्‍यता आहे. ई व्यापार क्षेत्रासाठी तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय धोरणाच्या प्रस्तावातून ही माहिती समोर आली आहे. या क्षेत्रात हिस्सा कमी असूनही ई व्यापार कंपन्यांच्या संस्थापकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कंपनी कायद्यात सुधारणा करण्याचा विचार सरकारकडून करण्यात येत आहे.
या धोरणाच्या प्रस्तावानुसार देशात साठवणूक करण्यात येणाऱ्या डेटामध्ये इंटरनेट ऑफ थिंग्स उपकरणातून गोळा करण्यात येईल. यामध्ये ई व्यापार कंपन्या, सोशल मीडिया आणि सर्च इंजिन्स या कंपन्यांना ही माहिती साठवण्याचे बंधन येण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि धोरणासाठी भारतात साठवणूक करण्यात येणाऱ्या माहितीचा वापर सरकारपर्यंत पोहोचले. या प्रस्तावानुसार भारतातून ई व्यापार क्षेत्रात होणाऱ्या व्यवहारांना विदेशी वेबसाईट्‌सनाही या नियमांचे पालन करावे लागणार आहे, यामुळे देशातील अनेक कंपन्यांना लाभ होईल. या प्रस्तावात ई व्यापार क्षेत्रात एफडीआयसाठी असणाऱया नियमांचेही पालन करावे लागणार आहे.
बाजारात मोबाईल फोनची घाऊक विक्री होत असते, त्यावर बंदी घालण्याची शक्‍यता आहे. यामुळे किमतीवर नियंत्रण येण्याची शक्‍यता आहे. सरकारने वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समिती स्थापन केली होती. या समितीची दुसरी बैठक लवकरच होणार आह. या बैठकीत हा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)