देशाच्या विकासात स्त्री शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण – पूनावाला

मंचर- आरटीईनुसार मुलींना मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळणे,हा त्यांचा हक्क आहे. सरकारच्या अनेक योजना आहेत. आमच्या स्वयंसेवी संस्थांना समाजातील हुशार, गरीब होतकरू मुलींना प्राथमिक ते पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत आम्ही करू. देशाच्या विकासात स्त्रियांचे योगदान मोठे आहे. स्त्री शिक्षणाचे महत्त्वही अनन्यसाधारण आहे. म्हणूनच मुलींना शिकवून कर्तृत्वान केले पाहिजे, असे आवाहन लीला पूनावाला फाउंडेशनचे चेअरमन फिरोज पूनावाला यांनी केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांडोली बुद्रुक आणि भाग शाळा महात्मा गांधी विद्यालय (ता. आंबेगाव) येथील मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात लीला पूनावाला फाउंडेशनचे चेअरमन फिरोज पूनावाला बोलत होते. मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी फाऊंडेशनच्या वतीने स्कूल बॅग, वॉटर बॉटल, रेनकोट व इतर शैक्षणिक साहित्याची 57 मुलींना वाटप करण्यात आले. यावेळी युवासेना अध्यक्ष आणि व्यवस्थापन समिती तज्ज्ञ सदस्य प्रवीण थोरात, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गुलाब थोरात, ग्रामपंचायत सदस्य उत्तम थोरात, युवा कार्यकर्ते अक्षय खरमाळे, मुख्याध्यापक काशिनाथ वाबळे, विभाग प्रमुख काळे तसेच सर्व शिक्षक वृंद आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होणार करण्याकामी शिक्षिका दीपाली आजाब, नंदिनी पडवळ, सुनिता धिमते, रूपाली लाळगे, वैशाली थोरात यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहिदास सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन दत्ता गोरडे यांनी केले, तर आभार अक्षय खरमाळे यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)