देशाच्या राजधानीत शस्त्रास्त्रांसह दोघांना अटक

नवी दिल्ली – स्वातंत्र्यदिन तोंडावर आला असतानाच देशाची राजधानी दिल्लीत दोन शस्त्रास्त्र विक्रेत्यांना अटक करण्यात आली. मोहम्मद अझिम आणि आस मोहम्मद अशी त्यांची नावे आहेत. अझिम हा पश्‍चिम बंगालचा तर आस हा उत्तरप्रदेशचा रहिवासी आहे. त्यांच्याकडूून 50 पिस्तूल तसेच काही कार्बाईन आणि काडतुसे जप्त करण्यात आली.

मागील चार ते पाच वर्षांपासून ते दिल्लीतील गुंडांना शस्त्रास्त्रे पुरवत असल्याचे उघड झाले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर दिल्लीतील सुरक्षा आणखी कडक करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणांकडून संशयितांची कसूून तपासणी केली जात आहे. अशातच शस्त्रास्त्रांसह दोघे जाळ्यात सापडल्याच्या घडामोडीला सुरक्षा यंत्रणांकडून विशेष महत्व दिले जात आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)