जुन्नर-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशाच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान असून प्रत्येक भारतीय नागरिकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श विचारांचे जीवनात अनुकरण करावे, असे प्रतिपादन शिक्षण विस्तार अधिकारी अशोक लांडे यांनी केले. तांबे (ता. जुन्नर) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात जयंतीनिमित्ताने आयोजित कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना लांडे बोलत होते. यावेळी अशोक लांडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहाराने पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक व्ही. एच. चव्हाण, टीडीएफचे नेते भास्कर पानसरे, सतीश बोरकर, एच. डी. नांगरे, सामाजिक कार्यकर्ते तानाजी विरणक यांच्यासह ग्रामस्थ व शिक्षक उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
What is your reaction?
0
Thumbs up
0
Love
0
Joy
0
Awesome
0
Great
0
Sad
0
Angry