देशाच्या जडणघडणीत शाळांची भूमिका महत्त्वपूर्ण – अजय कवडे

ओतूरचया श्री गाडगे महाराज विद्यालयात स्नेहसंमेलना उत्साहात

ओतूर- स्नेहसंमेलनातील विविध कला आविष्कारांच्या सादरीकरणामुळे विद्यार्थ्यांचे सुप्त गुण विकसित होत आहेत. मुलांनी उच्च ध्येय मनात ठेवून सतत कष्ट करत यशाची पायरी चढत जावी. शाळेत राबवले जाणारे उपक्रमांमुळे देशाच्या जडणघडणीत शाळांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मत अजय कवडे व्यक्त केले.
ओतूर (ता. जुन्नर) येथे श्री गाडगे महाराज विद्यालयात गाडगेबाबांची 62 पुण्यतिथी आणि वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले, अशी माहिती मुख्याध्यापिका मंगल साबळे यांनी दिली. या संमेलनात अजय कवडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अजय कवडे होते. याप्रसंगी समाजकल्याण अतिरिक्त संचालक शशिकांत सावरकर, संस्थेचे संचालक नितीन पाटील, बालकल्याण पुणेचे अध्यक्ष विजया वांजपे, बालकल्याणचे सदस्य जयश्री मोघे, हभप सर्जेराव गाढवे, भानुविलास गाढवे, विघ्नहर कारखान्याचे संचालक धनंजय डुंबरे, कृष्णराव पाटील, शाहीर भीमराव ठोंगिरे, प्रकाश हिंगणे, स्मिता धानोरे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आदी दालनांचे उद्‌घाटन झाले. गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी 1999 च्या बॅचच्या वतीने वसतिगृहातील विद्यार्थ्यांना 300 स्वेटरचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारांना वाव व संधी देणारे हस्तलिखित “उन्मेष’ व “घोटूल’ यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शोभा तांबे आणि रविंद्र अहिनवे केले.आभार सुनिल डुकरे यांनी मानले, तर गाडगे बाबांचे पसायदान अशोक सोनोने यांनी सादर केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)