“देशाच्या जडणघडणीत बालवैज्ञानिक महत्त्वाचे’

कर्जत:बालवैज्ञानिक हे देशाच्या जडणघडणीतील महत्त्वाचे घटक असून त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. तरच आपण 2020 ला महासत्ता म्हणून उदयास येऊ असे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड यांनी व्यक्त केले. 44 वे तालुकास्तरीय गणित- विज्ञान प्रदर्शन व धाकोजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय निमगाव डाकू (ता.कर्जत)च्या प्रथम मजला इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, भाजपचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर होते. प्रा. बेरड म्हणाले, बालवैज्ञानिक हे देशाचे भावी शास्त्रज्ञ असून देशाच्या विकासाचे शिल्पकार आहेत. तीन दिवस चाललेल्या विज्ञान-गणित प्रदर्शनास शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले व काटमोरे यांनी भेटी दिल्या.

यावेळी उपसरपंच नानासाहेब पवार, अर्जुन भोज, संजय काकडे, प्रवीण ढोकरीकर, ईश्‍वर कोठावळे, अंकुश भांडवलकर, चेअरमन गणेश शेंडकर, गटशिक्षणाधिकारी सविता भोसले, शिक्षण विस्ताराधिकारी दिनेश लाळगे, चंद्रकांत राऊत, गणित संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रा. प्रमोद तोरडमल आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीपाद आडकर यांनी केले. तर प्राचार्य कय्युम मोमीन यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)