देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावली- छगन भुजबळ

 रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर म्हणून इतिहास तज्ज्ञ

रत्नागिरी: नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची अक्षरश: वाट लावली आहे. सरकारला पैसा कमी पडत असल्याने त्यांनी आरबीआयवर दबाव आणला. या दबावापोटी रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला. त्यानंतर रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर म्हणून इतिहासाचा तज्ज्ञ शक्तीकांत दास यांची नेमणूक केली. इथे इतिहास लिहायचा आहे का? इथे देशाची अर्थव्यवस्था सांभाळायची आहे, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी लगावला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेचा आजचा दुसरा दिवस असून खेड येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेवर तोफ डागली. खेड येथील सभेत छगन भुजबळ म्हणाले, सध्या नावं बदलण्याचा जमाना आहे. आता पेट्रोलचेही नाव बदलणार असून त्याचे नाव पंडीत दीनदयाळ उपाध्याय बहुमूल्य तरल पदार्थ असे ठेवले तर यात नवल वाटायचे कारण नाही, अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली.

सरकारकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी पैसे नाहीत. परंतु वायफाय देण्यासाठी कोट्यवधी रुपये आहेत. आता मला सांगा तुम्हाला वायफाय हवा की, भाकरी हवी, असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला. यावेळी विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी देखील सडकून टीका केली. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने परिवर्तन करण्याचा निर्धार केला असून जनतेला फसवणाऱ्या भाजप सरकारला घरी बसवण्याचे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.

…तर 15 फुटांचं रेडकू होईल का?

महाराष्ट्र सदन घोटाळ्यात 25 हजार कोटी खाल्ले असे बोलतात. मग म्हणाले 10 हजार कोटी खाल्ले. आता म्हणतात 850 कोटी. अरे कंत्राट फक्त 100 कोटींचे होते. ज्याने महाराष्ट्र सदन बांधल, तो कोकणात जाऊन बसला आहे. ज्याने इतकी सुंदर इमारत बांधली त्याला एक रुपयादेखील दिला नाही. तो माणूस मला 850 कोटी रुपये कसा देईल ?’ असा सवाल त्यांनी विचारला. पाच फुटांची गाय गाभण राहिली आणि बाळंत झाली तर तिला 15 फुटांचं रेडकू होईल का ? 100 कोटींचं कंत्राट दिल्यानंतर 850 कोटी खर्च होतात ?’, असा प्रश्न यावेळी छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)